मुंबईत कोरोनाचे नवीन 933 रुग्ण, 34 जणांचा मृत्यू; आतापर्यंत 655 बळी

मुंबईत कोव्हिड-19 च्या आणखी 933 रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 17,512 झाला. कोरोनाबाधेने 34 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 655 वर पोहोचली. दगावलेल्या 34 जणांपैकी 10 जणांचा मृत्यू आठवडाभरापूर्वी झाल्याचे सांगण्यात आले.
933 new corona patient found in mumbai
933 new corona patient found in mumbai

मुंबई  : मुंबईत कोव्हिड-19 च्या आणखी 933 रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 17,512 झाला. कोरोनाबाधेने 34 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 655 वर पोहोचली. दगावलेल्या 34 जणांपैकी 10 जणांचा मृत्यू आठवडाभरापूर्वी झाल्याचे सांगण्यात आले.

मुंबईतील वेगवेगळ्या भागांत शुक्रवारी 933 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्याने रुग्णांची संख्या 17,512 वर गेली. या 933 रुग्णांपैकी 702 जणांची नोंद शुक्रवारी झाली, तर 231 जण दोन दिवसांपूर्वी दाखल झाले होते. दगावलेल्या 34 जणांपैकी 16 रुग्णांना अन्य दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 21 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी तिघे 40 वर्षांखालील, 13 रुग्ण 60 वर्षांवरील आणि 18 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते. मुंबईतील कोरोनाबळींची संख्या आता 655 झाली आहे.

शुक्रवारी 650 नवीन संशयित रुग्ण सापडले; आतापर्यंत 18,027 संशयित रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आणखी 334 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 4568 जणांना घरी पाठवण्यात आले आहे.

अतिरिक्त रुग्णवाहिका
कोव्हिड-19 रुग्णांना कोरोना काळजी केंद्रे, रुग्णालये आदी ठिकाणांहून नेताना उशीर होत असल्याच्या तक्रारी आहेत. या समस्येवर महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. बेस्ट बस तसेच वाहतूक आयुक्तांनी पुरवलेल्या वाहनांचे रूपांतर रुग्णवाहिकांमध्ये करण्यात आले आहे. या रुग्णवाहिकांतील चालक आणि मदतनिसांना आठवडाभर पुरतील इतके सुरक्षा पेहराव दिले जात आहेत. 

रुग्णांची वाहतूक करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या 70 आणि एसटी महामंडळाच्या 15 बसगाड्या देण्यात आल्या आहेत. तीव्र बाधा असलेल्या रुग्णांसाठी 108 सेवेतील 60 रुग्णवाहिका सतत चालवल्या जात आहेत. महापालिकेने आणखी 20 रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना महापालिकेच्या आपत्कालीन कक्षातील 1916 क्रमांकावर संपर्क साधून डॉक्‍टरांचा सल्ला, रुग्णवाहिका, उपलब्ध खाटा व इतर माहिती मिळवता येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com